Breaking News
[uam_ad id="34152"]
Home / देश / मुख्यमंत्री वैद्यकीय निधीबद्दल मोठा निर्णय

मुख्यमंत्री वैद्यकीय निधीबद्दल मोठा निर्णय

 मुख्यमंत्री वैद्यकीय निधीबद्दल मोठा निर्णय

मुंबई : गेल्या बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षेत असणाऱ्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी प्रकरणी एक मोठा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. सध्याच्या घडीला गरजू रुग्णांच्या मदतीसाठी वैद्यकीय निधीचं काम महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत केलं जाणार आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या या प्रकरणावर अखेर महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे. ज्याअंतर्गत मदतीसाठीचे अर्ज स्वीकारून ते निकाली काढण्याचं काम हे वरळी येथील कार्यालयातून होणार आहे. महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेच्या कार्यालयात मदतीसाठीचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. ही तात्पुरती सोय करण्यात आली असून, मदतीचे धनादेश हे मंत्रालयात स्वीकारण्यात येणार आहेत.

राष्ट्रपती राजवटीच्या काळात घेण्यात आलेल्या या निर्णयाचा गरजू आणि गरीब रुग्णांना याची मदत होणार आहे. सध्या मंत्रालयात सहाव्या मजल्यावर या कक्षाच्या निधीसाठी देण्यात येणारे मदतीचे चेक स्वीकारले जात आहेत….

Check Also

Google ने Paytm को प्ले स्टोर से हटाया |

Google ने Paytm को प्ले स्टोर से हटाया, नियमों के उल्लंघन का आरोप देश के …

प्रातिक्रिया दे

आपका ईमेल पता प्रकाशित नहीं किया जाएगा. आवश्यक फ़ील्ड चिह्नित हैं *